खरे आहे, अशी चर्चा या आधीच व्हायला हवी होती. प्रत्येक सभासदाने आपण करत असलेल्या कामाची माहिती कळवावी, राहातं ठिकाणं आणि संपर्कासाठी ई पत्ता कळवावा. त्यामुळे एखाद्याला एखादे काम करवयाचे असल्यास, आणि आपल्यापैकी एखादा सभासद जवळपास उपलब्ध असल्यास त्यांच्याकडून ते करता येईल. उदा. मला माझ्या कामात, यादव-गुप्ता कुलोत्पन्न व्यक्तिंची मदत घ्यावी लागते कारण हे काम करणारी मराठी व्यक्ति माझ्या माहितीत नाही. त्यामुळे माझ्या इच्छेविरूध्द मला हे काम त्यांच्याकडून करावे लागते.