खरं तर गडे ही/ सखे ही/ नकोशी/ खुळ्याने या जागी बरेच योग्य शब्द टाकता येतील, जसे की उशाशी/ तरीही...
किंवा...
का अवस एकट्याने जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
इथे ती रात्र कुणी जागून काढली आहे हे कळत नाही त्यामुळे लज्जत वाढेल असं वाटतं. आणि मी जागलो असं दाखवायचं असेल तर का हा प्रश्नार्थ काढून मी टाकले तरी चालेल...
पण त्या दोन लघूंचा बंदोबस्त करण्यासाठी अमावस्येचा कृष्णरात्र हा बदल खाली दिला आहे तो कसा वाटतो... (चंद्रविरही रात्र भासवण्यासाठी आंधळी पेक्षा कृष्णरात्र नक्कीच प्रभावी वाटेल...)
का कृष्णरात्र सारी जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला