खरोखर अविस्मरणीय अनुभव !
आज ३० तारीख! आज राहुल येणार!! लग्न आता अगदी २ दिवसांवर!! तेवढ्यात बातमी आली, 'रनवे वर विमान घसरल्या मुळे मुंबई विमानतळ पुन्हा बंद करण्यात आले आहे'....आज तरी राहुल येईल का? साप-शिडीतल्या सोंगटी सारखी आमची अवस्था होती. शिडी चढून वर जातो तोच पुढे सापावरून खाली घसरतो! सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता.
नवरा-नवरी दोघे एकच गाडीत, एकही फ़ूल नसलेली लग्नाची गाडी-ट्रॅक्स, जीन्स, टी-शर्ट, हाफ़पॅण्ट घातलेले वऱ्हाडी आणि नवरदेव..
हे खास !! वाचताना गमतीशीर वाटत आहे पण प्रत्यक्षात या सर्व लोकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करू शकत नाही !
कल्याणीचे लग्न १ ऑगस्ट ला होते म्हणून जरा तरी बरे !
ज्यांच्या लग्नाचे मुहूर्त ऐन २६ जुलै असतील त्यांचे काय झाले असेल !!