प्राचीन भारतातील गोष्टी खऱ्या की खोट्या हे सिद्ध करण्यापासून भारतीयांना कोणीच रोखलेले नाही. प्राचीन भारतातील यच्चयावत चमत्कार मानल्या गेलेल्या कथा प्रत्यक्षात उतरवून आणता आल्यास भारतीयांना नोबेल पारितोषिक हमखास मिळेल. पाशात्यांनी त्यांच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर ज्या गोष्टी शोधल्या त्यांना "हे भारतात आधीपासूनच होतं' असे फक्त आपण भारतीयच म्हणतो. जग असं काहीही भारताबद्दल म्हणत नाही. उगीच त्यांचे श्रेय हिरावून घेण्यात अर्थ नाही.