नक्की कशासाठी म्हणजे पार्टी वगैरे साठीचे पदार्थ ते समजले असते तर बरे झाले असते. तरीही मला सुचलेले

१. पावाचे चे सँडविच यात अनेक प्रकार करता येतात जसे चटणी, चीज, भाज्या घालून, सॉस, जॅम इ.
२. दही-पोहे - जाडे पोहे भिजवून, त्यात दही, ताक, मीठ आणि चवीला कुठलीही चटणी/लोणचे/ठेचा घालून खाणे
३. दूध-पोहे - जाडे पोहे भिजवून त्यात दूध, गोडा मसाला, साखर, चमचाभर दही, चवीला मीठ घालून खाणे
४. मक्याच्या दाण्याची भेळ - कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर उकडलेल्या मक्याच्या दाण्यात घालणे
५. वरीलप्रमाणे मोड आलेल्या कडधान्याची भेळ करता येते.
६. मॅगी, पास्ता
७. तेल नको आहे म्हणता खरे पण तरीही झटपट म्हणून लिहिण्याचा मोह होतो.  ज्वारीच्या लाह्यांमधे मीठ, मेतकूट, तिखट आणि कच्चे तेल घालून खाणे.
आणखी सुचले तर लिहीन.