मला एकदा (प्रेमाने) सुनावण्यात आले होते, "तू भारतात कायमचा परत आलास तर, तुझा 'सदमा' मधील कमल हसन होईल. तुला १०-१५ वार्षांपुर्वीचा भारत आठवतोय आणि भारतातील वास्तव मात्र..."!

अहो आम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत भारतात असूनही गेली ५-६ वर्षे आमचा सध्या पावलोपावली सदमा मधला कमल हसन होतो आहे. शेजारची ११ वी मधली मुलगी 'तो नाही. तो माझा २ महिन्यापूर्वीचा बॉयफ्रेंड होता. आता निलेश आहे.' म्हणते तेव्हा, १ महिन्यापूर्वी ३०० रु /चौफूट असलेली जागा आज ८०० रु. होते तेव्हा..वास्तू प्रदर्शनात ४ खोल्यांच्या घराची किंमत १ करोड ३३ लाख सांगितली जाते तेव्हा.. आणि काही ऋतूंत ३५ रु. ला सुबक आणि सडपातळ फ्लॉवर घ्यावा लागतो तेव्हापण.