हा स्त्रियांवरील अत्याचार वगैरे काही नसून दलितांवरील अत्याचारच आहे. अत्याचार होण्याचे कारण ती व्यक्ती स्त्री होती हे नाही. चार व्यक्तींना जमावाने मारले आहे. यात दोन पुरुष आणि दोन स्त्रिया होत्या.

आरक्षण, दलितांना देण्यात येणाऱ्या सवलती यामुळे प्रगती करू पाहत असलेल्या दलित समाजाचे छोटेसे यश (अगदी स्वतःची जमीन स्वतः कसून पोट भरणे) हे देखील कुणाच्या पोटदुखीचे कारण ठरू शकते.

स्त्रियांविरुद्ध गुन्हा असा सूर लावला की दलितांची मतपेटी हातातून जाणार नाही असे कदाचित राज्यकर्त्यांना वाटत असावे.

छू,

तुमच्या दोन चर्चांमधील वाक्ये एकत्रच वर दिली आहेत.  या अधोरेखित वाक्यावरून असे वाटते की  स्त्रियांवरील अत्याचार म्हटल्यावर ह्या अपराधाचे महत्त्व कमी झाले असे काहीसे म्हणायचे आहे असे वाटते आहे.  मला फक्त  येथे जमीन, गावकीचे वाद, पूर्वीची भांडणे, अटक इत्यादी गोष्टी असल्याने झालेल्या प्रकाराचा बारकाईने शोध घेतला पाहिजे असेही वाटते.   गजभियेला मारहाण केल्यानंतर आय.पी. सी. च्या कायद्याप्रमाणे अटक होऊन जामीनावर सुटका झालेल्या ज्या गावकऱ्यांना कदाचित त्यांच्यावर गजभिये हा त्याला जमावाने मारल्यामुळे अट्रॉसिटी कायदा लागू करून घेण्यात यशस्वी झाला असता तर काय झाले असते याची कल्पना आली असेल -त्यांनी या गोष्टीसाठी त्यांच्या दृष्टीने कारण असलेल्या गजभियेचा शोध सुरु केला असावा आणि तो न सापडल्यामुळे अजून चिडून जाऊन भोतमांगे कुटुंबातील दुबळ्या एकाकी स्त्री-पुरुषांना शिकार केले असावे असेही असू शकते.  एखादे कुटुंब नुसतेच दलित म्हणून त्यांच्यावर हल्ला करणे यापेक्षा अट्रॉसिटी कायदा हा ह्या विशिष्ट कुटुंबाला संरक्षण देऊ शकतो/ हे  कुटुंब/व्यक्ती या कायद्याचा वापर करू पहात होते या दोन्ही गोष्टींचा बसलेला धक्का आणि त्यामुळे जमावाने बिथरणे आणि हल्ला करणे ही शक्यता मला जास्त वाटते.  

मला वाटते - सामाजिक अत्याचार व्यक्ती स्त्री वर केलेला असो, किंवा दलित, किंवा अजून कोणी आर्थिक किंवा सामाजिक रित्या दुर्बळ घटकावर - काहीही असले तरी अश्या घटनेचे महत्त्व/गांभीर्य तेवढेच राहते आणि अपराध हा तेवढाच अक्षम्य ठरतो असे वाटते आणि भारतीय कायद्यांप्रमाणे जी शिक्षा अश्या गुन्ह्यांना आहे ती झालीच पाहिजे असेच मी म्हणेन.   

 

सुहासिनी