फिनलंडला आय.वाय.एस.शी (इंटरनॅशनल यूथ सर्विस) संपर्क साधून असे पत्र मित्र जमवता यायचे. मी शाळेत असताना हे फॅड जोरात होते.

माझीही एक ऑस्ट्रियन मुलीशी, एका मूळ भारतीय वंशाच्या मॉरिशसच्या मुलाशी णि एका ब्राझिलिअन मुलीशी बराच काळ पत्रमैत्री होती. आता नाही.

त्यापैकी ऑस्ट्रियन मैत्रिणीशी सुमारे १३-१४ वर्षे मैत्री राहिली पण नंतर इंटरनेटसारख्या जलद माध्यमाचा अभाव व सतत जागा बदलणे (दोघींनीही) यामुळे ताटातूट झाली. तिची आठवण बरेचदा येते, अर्थात पत्ता शोधून काढणे शक्य नाही.

वा! लेखामुळे जुन्या आठवणि जाग्या झाल्या.