सहमत.
थोडक्यात, मराठी भाषेतून व्यवहार करायला हवेत. म्हणजे पानवाल्यापासून मॉलवाल्यापर्यंत सगळ्यांशी कटाक्षाने, न लाजता मराठीत बोलायला हवे. मराठी खऱ्या अर्थाने प्रशासकीय भाषा व्हायला करायला हवे. सगळे अर्ज मराठीतून द्यावे. सगळा पत्रव्यवहारातून करावा. पण प्रशासकीय भाषाही सामान्यांना आपली वाटायला हवी. तिचे सोपीकरण व्हायला हवे. (मराठी भाषा ही बहुजनांची भाषा आहे हे लक्षात घ्यायला हवे. शहरी मध्यमवर्ग किंवा ब्राह्मणी वर्ग मराठीला त्यागतो आहे. मराठी साहित्य आणि मराठी भाषेचे भविष्य बहुजन समाज घडवणार आहे, हे एका विद्वानाचे मत इथे नमूद करावेसे वाटते.)
मराठी भाषेतून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवे. मराठीत अधिकाधिक पुस्तके, ग्रंथ, शब्दकोश प्रकाशित व्हायला हवेत. हे उपाय नवे नाहीत. पण अमलात यायला हवेत.