मराठी दोन = संस्कृत द्वि = लॅटिन दुओ (?) = स्पॅनिश दोस*
मराठी तीन = संस्कृत त्रि = लॅटिन त्रेस = स्पॅनिश त्रेस
मराठी चार = संस्कृत चतुर् = लॅटिन क्वातुओर (?) = स्पॅनिश क्वात्रो
मराठी सात = संस्कृत सप्त = लॅटिन सेप्टेम (?) = स्पॅनिश सिएते
मराठी आठ = संस्कृत अष्ट = लॅटिन ऑक्टो (?) = स्पॅनिश ओचो
मराठी नऊ = संस्कृत नव = लॅटिन नोवेम = स्पॅनिश नुएवे
*अवांतर: दोनसाठी इंग्रजी टू (two) या शब्दाच्या स्पेलिंगमधले w हे अक्षर त्या शब्दाचे 'द्वि'शी नाते दर्शवते. (याचा अर्थ 'द्वि'पासून 'टू' उद्भवला असा नव्हे. केवळ 'टू' ज्या मूळ शब्दापासून उद्भवला त्या शब्दाचे 'द्वि'शी भाषिक नाते आहे, दोघांचेही मूळ कोठेतरी सारखे आहे, एवढेच. संदर्भ जर्मन zweiशी twoचे अर्थातच अधिक जवळचे नाते आहे, परंतु two, zwei, द्वि वगैरे शब्दांचा उगम कोठेतरी सारखा असावा.)