(माझ्या) लहानपणी बाळ ज. पंडित, प्रोफेसर करमरकर वगैरे मंडळी* जे मराठीतून धावते वर्णन करायची, ते ऐकून मजा यायची. त्यातील मराठी प्रतिशब्द थोडे विचित्र वाटले तरी.

कदाचित त्या काळी सदाशिव-नारायण-शनिवार संस्कृतीत वाढत असल्याचा परिणाम असेल. (तसा त्या संस्कृतीचा नाही तरी** भाषेचा प्रभाव अजूनही टिकून आहे म्हणा.)

- टग्या.

* मध्येच या लोकांना आपले उच्च मराठी पाजळण्याची हुक्की येत असे. (म्हणजे अधूनमधून मला मनोगतावर आपली अक्कल पाजळण्याची हुक्की येते, अगदी तश्शी!) मग 'कपिल देव जेव्हा क्रीडांगणावर येतात, तेव्हा प्रेक्षकांना त्यांच्याकडून षट्कारांवर षट्कारांची अपेक्षा असते. आणि ते ती सहसा पूर्ण करतातच. कपिल देव क्रीडांगणावर उतरले आणि त्यांनी प्रेक्षकांची षट्कारांची अपेक्षा पूर्ण केली नाही असे कधी घडलेच, तर त्याला कपिलाषष्ठीचा योग म्हणावा लागेल.' असले तारे तोडलेले ऐकायला मिळत.

** तो कधीच नव्हता म्हणा.