काही लोकांना इंग्रजी शब्द वापरताना त्यांचे मराठीकरण करणे हा उपाय आवडला.. त्यांना 'टेबलवर ऐवजी टेबलावर' व 'बॅगमध्ये ऐवजी बॅगेत' वापरणे आवडते!
म्हणजे, इंग्रजीचे हात - पाय तोडून ते मराठीत वापरण्याची तयारी, पण मराठीतील शब्द वापरण्याची इच्छा नाही. हि मानसिकता मला समजली नाही.. असो..
ह्या संदर्भात अमेरिकेतील मजेदार किस्सा:
विनंती: हा किस्सा जरा पानचट आहे. कोणाचे मान किंवा इतर काही दुखवण्याचा हेतू नाही.
एका दुकानात (वॉलमार्ट) आम्ही काही सहकारी गेलो होतो. तेथे, सामान घेऊन पैसे देण्याच्या वळी, एका अमेरिकन स्त्री चे एक सेंट चे नाणे गडबडीत जमिनीवर पडले. आमच्या पैकी एका सहकाऱ्याने 'तुमचे एक सेंट चे नाणे जमिनीवर पडले' ह्याचे इंग्रजीत 'एक्सुज मी मॅम, युवर पिनस ('penus') ईज लाईंग डाउन' असे सांगितले!!
तो चुकून पेनीज ('pennies') ऐवजी भलतेच म्हणाला...