हॅम्लेट साहेब,

माझ्या लिहीण्यातून वेगळा अर्थ निघाला असल्यास क्षमस्व. मी इथे शिख समाजाला आणू इच्छीत नव्हतो. किंवा पंतप्रधान पक्षपाती निर्णय घेतील असेही म्हणायचे नाही. मला त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरच आहे. सर्वच राजकारणी सारखे आहेत यावर मी आपल्याशी १००% सहमत आहे.

पण जी व्यक्ती स्वतःच्या समाजावरच्या अन्यायावर कधी काही बोलली नाही ती व्यक्ती एक राजकीय नेतृत्व म्हणून ते काही ठोस निर्णय घेतील असे वाटत नाही एव्हढेच म्हणायचे होते. यात इतर कोणतेही राजकारण बोलण्याचा उद्देश नव्हता.