तकरार आणि अर्ज हे दोन्ही शब्द फार्सी!

असो, तुम्हाला मी दिलेले शब्द पटले नाहीत. नाइलाज आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिशब्दांतले निम्मे शब्द अरबी-फार्सी-उर्दू असावेत असे मला वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

जनरल - औटभरण हे कळले नाही. जनरल म्हणजे जनरल स्टोअर्स मधले म्हणत होते मी.

शब्द वापरत नसल्याने

मी स्वतःच वर म्हटल्याप्रमाणे आपण अप्रचलित मराठी शब्द प्रचारात आणायचा प्रयत्न करतो, नवे शब्द तयार करतो आहोत. (उदा. संपूर्ण मराठी लिहिण्याचा प्रयोग म्हणून मी हा नट्सफ़र्डचा लेख लिहिला होता.) पण ते पुरेसे नाही असे मला वाटते. असो. तुम्ही प्रतिवादातील मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्नही करत नसल्याने पुढे चर्चा व्यर्थ आहे.