महारथ्यांच्या भांडणात पायदळाने पडू नये म्हणतात, पण येथे ती चूक(?) मी करीत आहे.
नितीननी लिहिले
मूळ इंग्रजी भाषेत शब्द आहेत, पण मराठीत त्याला प्रती शब्द नसणे, अशी काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.
अपील = तकरारअर्ज
लेबल = अंकपट्टि
जनरल = औटभरण
अपील म्हणजे तकरारीचा समाधानकारक निकाल न मिळाल्यावर केलेला अर्ज, तकरार अर्ज नव्हे.
लेबलावर नुसते अंक नसतात. माहितीपट्टीका म्हणा हवे तर.
जनरलचे इंग्लिशमध्येच अनेक अर्थ आहेत. उदा. सैन्यातील पद. याचे मराठीकरण अशक्य आहे. सेनापती? मग कमांडर म्हणजे काय? मेजर? कर्नल? जनरलचा दुसरा अर्थ होतो साधारण. तिसरा अर्थ आहे सर्वसमावेशक. उदा- जनरल प्रॅक्टिशनर. चौथा अर्थ आहे जवळपास (इनएक्झॅक्ट.)
सांगण्याचा मुद्दा काय तर प्रत्येक भाषेतील प्रत्येक शब्दाच्या प्रत्येक नुआन्सला(याचा म. प्र. काय?) मराठी प्रतिशब्द असेलच असे नाही. जी भाषा सगळ्यात जास्त शब्दांची आयात करते ती भाषा जास्तीत जास्त प्रचलित होते. पहा - इंग्लिश. प्रतिउदाहरण - संस्कृत :-(
हे औटभरण म्हणजे काय हे आपल्याला बाउन्सर गेले (बाउन्सर... ह्म्म)
असो. आता माझ्यावरच तोफखाना फिरु नये अशी आशा
क. लो. अ.
अभय नातू
त.टी. - मला पूर्वी आगगाडीला अग्निरथ आणी सिग्नलला अग्निरथगमनागमनसूचकताम्रलोहपट्टिका असे म्हणत असल्याचे आठवते आहे. भाषा ही प्रगतीशील (इव्हॉल्व्हिंग) असावी, असे माझे नम्र मत आहे. अन्यथा असे हास्यास्पद शब्द त्यात घुसतात. अर्थात, आता 'आग'गाडीही नसते आणी सिग्नलही ताम्र-लोहाचे नसतात.