स्वातीताई,
तुम्ही अशी पत्रमैत्री जपलीत हे वाचून खूप छान वाटलं.
(अगदी 'पत्रमैत्री'त पडावं असं वाटलं!)

चित्रात असावीत अशी जुनी घरं....
खरं आहे तुमचं म्हणणं. माझ्या मनात आलं-
१) पुण्यात जुने वाडे होते पूर्वी; त्यांची दारं, आतली बैठी घरं इ. गोष्टी निदान एका वाड्याच्या तरी जपायला हव्यात. सुंदर तऱ्हेनं त्यांचं रूपांतर करता येईल.
२) अनेक मजली असलेल्या कौलारू इमारतीही नुसत्याच सिमेंट-काँक्रीटच्या इमारतींपेक्षा सुबक दिसतात. मुंबईत मात्र आता कौलारू इमारती / कोकणातल्यासारखे चिरे वापरून (जे पावसाच्या दृष्टीनं टिकाऊ असतात) बांधलेली घरं आता नामशेष होत चालली आहेत!

- कुमार