मृत्यू पावलेले लोक (बहुधा) दलित, पीडीत होते परंतु परप्रांतीय होते. हे तर अनुल्लेखाचे कारण नाही ना? माझा इशारा खैरलांजी प्रकरणी न लिहिलेल्यांविरुद्ध आकस धरणाऱ्यांकडे आहे.
चर्चा चांगली आहे. त्यावर अधिक लेख वाचून प्रतिसाद लिहायला आवडेल, आता वेळ नसल्याने ते करत नाही.
एक गोष्ट खटकली. उद्धृत वाक्याचा या चर्चेशी संबंध नाही. खैरलांजीची घटना आणि ही घटना यांत फरक आहे आणि लावलेला संबंध ओढून ताणून आहे असे मला वाटत. (चू. भू. दे. घे) खैरलांजीच्या चर्चेत ज्यांचा आकस दिसून आला त्यांचा निषेध तिथल्या तिथेच अनेकांनी केला. तो तिथेच थांबायला हवा होता. ती चर्चा अजूनही सुरू असल्याने आपण तिथे जाऊन सदर व्यक्तीला हा प्रश्न विचारू शकला असता. त्यासाठी दुसऱ्या चर्चेत आपण ओढलेला मुद्दा मला अनावश्यक वाटतो.
मजेखातर, ह. घेण्याजोगे किंवा विषयाशी संबंधित काहीतरी निघाले म्हणून आठवण करून देणे वेगळे आणि जो विषय संपायला हवा त्याची आठवण घोळवत ठेवणे वेगळे. (असे प्रकार माझ्याहीकडून या पूर्वी झालेले आहेत असे वाटते परंतु बदलत्या वेळेची नस पकडायला नको का?)
अशा व्यक्तीगत टीप्पणीयुक्त लिखाणासाठीच प्रशासनाला 'आपापसात' हे सदर सुरू करावे लागले असे वाटते. नको वाटणारे प्रतिसाद उडवून लावण्याचा प्रशासनाचा हल्लीचा पण पाहता प्रशासनाला कोणत्याप्रकारचे प्रतिसाद मनोगतावर अपेक्षित आहेत याचा थोडाफार अंदाज लावता येतो. असे असताना झाल्या-गेल्या गोष्टीचा विनाकारण पुनरुच्चार करण्याची गरज का भासावी?
मनोगतावर सर्वांनी यावे, प्रत्येक जातीच्या, स्तराच्या आणि वयाच्या माणसांनी. एखादा चुकला असे वाटत असेल तर त्याचा तिथेच निषेध करावा; पण सतत त्याच त्याच गोष्टीची आठवण करून दिल्याने एखादा माणूस मनोगतावरून नाराज होऊन निघून जाण्याची शक्यता आहे. विशेषतः मनोगतावर अनेक नवीन लोक येत असता अशा वाक्यांमुळे चुकीचा पायंडाही पडू शकेल.
असो. मनापासून वाटले म्हणून लिहिले. अशा गोष्टी माझ्या हातून घडल्याच नाहीत हे म्हणू शकत नाहीच. भविष्यात घडणार नाहीत असेही नाही; असे झाल्यास तिथल्या तिथे समज द्यावी. प्रशासनाचे बदललेले धोरण लक्षात आले आहे, मनोगतावरचा रेटा पाहता अशा गोष्टींची गरज नाही असे वाटले म्हणूनच हा मुद्दा उचलून धरावासा वाटला.
चू. भू. द्या. घ्या.
प्रियाली