रोहिणीताई,

मी दुकानात जाते आणि जे त्यावेळी घ्यावेसे वाटतील ते बटाटे घेते!  पण खरे तर त्यांचे विविध प्रकार हे वेगवेगळ्या पदार्थांसाठी कामी येतात.  जसे लाल सालीचे बटाटे हे इथल्या प्रकारे सॅलड करताना वापरता येतात कारण उकडल्यानंतर ते त्यांचा आकार हा काळ्या सालीच्या (मला वाटते - रसेट) बटाट्यांपेक्षा चांगला राहतो ( एकदम मऊ होत नाही).  लाल आणि पांढऱट (गोल्ड किंवा व्हाइट) बटाट्यांची साल जरा पातळ असते. माझा एकंदर अनुभव असा की जे बटाटे पातळ सालीचे असतात - ते फोडी/काचऱ्या करायला किंवा सॅलडसाठी चांगले आणि ज्यांची साल जरा जाड ते पावभाजी/मॅश पटेटो  करायला बरे कारण ते उकडल्यावर एकदम मऊ शिजतात आणि मऊ करायला त्रास होत नाही.

कांदे पिवळे किंवा लाल कोणतेही चालतात - पण लहान बघून घ्यावेत.   पिवळे त्यामानाने कमी तिखट आणि लाल जरा जास्त चांगले चिरता येतात. माझा अनुभव असा आहे की पिवळ्या कांद्यांना परतताना पाणी जरा जास्त सुटते.  लाल कांदे जरा नीट परतता येतात.