चर्चा चांगली आहे. त्यावर अधिक लेख वाचून प्रतिसाद लिहायला आवडेल, आता वेळ नसल्याने ते करत नाही.

हे लिहून मग आपण सविस्तर उत्तर दिलेत. आभारी आहे. जर तुम्हाला वेळ असता तर माझी काही खैर नव्हती :-)

असे लिहिण्याचे कारण दुटप्पीपणाने वागणारी, बोलणारी माणसे होय. आपण सांगे लोकांना... करणाऱ्या व्यक्तींचा मला अतिशय तिटकारा आहे. त्यामुळे मी असे लिहिले.

आपण लिहिलेत -

नको वाटणारे प्रतिसाद उडवून लावण्याचा प्रशासनाचा हल्लीचा पण पाहता प्रशासनाला कोणत्याप्रकारचे प्रतिसाद मनोगतावर अपेक्षित आहेत याचा थोडाफार अंदाज लावता येतो.

 आणी मग लिहिलेत -

पण सतत त्याच त्याच गोष्टीची आठवण करून दिल्याने एखादा माणूस मनोगतावरून नाराज होऊन निघून जाण्याची शक्यता आहे.

आता तुम्हीच ठरवा की माझ्यासारख्याच्या बोलण्याने माणूस नाराज होण्याची शक्यता जास्त आहे कि प्रशासनाच्या अश्या वागण्याने? (प्रशासनाने पाहिजे तसे वागावे, तो त्यांचा अधिकारच आहे) माझ्या टिप्पणीने नाराज होण्याइतक्या हळव्या मनाच्या लोकांनी येथे येउ नयेच. (शाब्दिक)लाथा मारायच्या तर (शाब्दिकच)बुक्के खाण्याचीही तयारी ठेवलीच पाहिजेच.

असो. हे अवांतर होत चालले आहे. आपल्याबद्दल व आपल्या लिखाणाबद्दल मला आदरच आहे. तुम्ही दाखवून दिलेली त्रुटी मी मान्य करतो व पुन: असे घडणार नाही याची शाश्वती देता प्रयत्न करतो*.

क. लो. अ.

अ. ना.

त. टी. * माझ्या वागण्याबद्दल मी तर काय, ब्रह्मदेवही शाश्वती देणार नाही असे मला सांगण्यात आले आहे. पण मी प्रयत्न जरूर करेन :-)