काही लोकांना इंग्रजी शब्द वापरताना त्यांचे मराठीकरण करणे हा उपाय आवडला.. त्यांना 'टेबलवर ऐवजी टेबलावर' व 'बॅगमध्ये ऐवजी बॅगेत' वापरणे आवडते!
म्हणजे, इंग्रजीचे हात - पाय तोडून ते मराठीत वापरण्याची तयारी, पण मराठीतील शब्द वापरण्याची इच्छा नाही. हि मानसिकता मला समजली नाही.. असो..
नितीनरावांचा हा प्रतिसाद खास करून मृदुलाताईंना आणि त्यांच्या मुद्द्याचे समर्थन केले म्हणून मलाही असावा असे वाटते.
नितीनराव भाषाशास्त्र विषयातला मी मोठा ज्ञानी नाही पण तुमचा ज्यांच्याशी वाद झाला त्यातले बरेचसे लोक या विषयातले माहिती ठेवून असलेल्या व्यक्ती आहेत त्यात मी माझ्या वैयक्तिक पातळीवर मृदुलाताईं, चित्त, मिलींद या व्यक्तींच्या त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानावर विश्वास ठेवून आहे. त्यांच्या भूमिका सर्वसाधारणता त्यांच्या भूमिका तर्कनिष्ठ असल्याचे नेहमी जाणवते.
नितीनरावांची भूमिका भावनिक अधिक असल्याचे जाणवते. २०शतकाच्या पूर्वार्धात झालेल्या भाषाशुद्धीकरण चळवळीशी नाते सांगणारी आजही बरीच मंडळी आहेत. भाषाशुद्धीकरण चळवळी संदर्भात मी मराठी विकिपीडिया वरील दुवा या मनोगती मंडळींनी वाचला आहे का ते समजण्यास मार्ग नाही तसे त्यांनी करावे ही सहमनोगतीची विनंती टाळणार नाहीत असा विश्वास वाटतो.
भाषाशुद्धीकरण चळवळ भाषाशास्त्राच्या दृष्टीने इतिहासाचा भाग आहे. संयुक्त महारोष्ट्रोत्तर काळात पारिभाषिक शब्द बनवण्या करिता बनलेल्या विविध समिती आणि त्या नंतर मराठी भाषातज्ज्ञांनी मराठीकरण हा सर्वसाधारणता मान्य केलेला मार्ग आहे. मोठ्या मोठ्या तज्ज्ञाची नावे घेण्या इतका मी मोठा नाही पण तर्कतीर्थांचेही 'मराठीकरणाच्या भूमिकेस पाठिंबा असल्याचे स्मरते.
भाषा इंडिया संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ संपादक श्री.पु भागवत म्हणतात ""शब्दाला प्रतिशब्द काढू नये. एक शब्द निवडून त्याला एकापेक्षा अधिक शब्द काढावे. मूळ शब्दाला सर्वात जवळ जाणारा आणि सोपा शब्द निवडावा. जो शब्द रुळेल तो प्रमाण म्हणून घ्यावा. मराठीमध्ये रुळलेले काही इंग्रजी शब्द तसेच ठेवा"
खास करून विज्ञानातील प्रत्येक संज्ञेचे मराठीत भाषांतर केलेच पाहिजे असे नाही अशीच तज्ज्ञाची भूमिका आहे. या बद्दल मी संपूर्ण लेखन मराठी विकिवर उपलब्ध करावे असा मनोदय ठेवून आहे.
आपला
-(मराठीयेबल) विकिकर