चांगले वाटले.
खरे तर अभयरावांच्या वाक्यावर अजून लिहावे का सोडून द्यावे या बद्दल खरेच द्विधा मनस्थितीत होतो. आम्ही दलितांची बाजू घेणारे फुटपाथावर मेलेल्यांचे दलित असणे कसे विसरलो असा अभयरावांचा औपरोधिक रोख आहे असे वाटते. उलटपक्षी त्यांच्या दलित असून दलित असण्याला दलितांनी दुर्लक्षीत केले हा दलितांचा डोळसपणा झाला.
अपघातात मरणाऱ्यांची बाजू घेताना त्यांचे सवर्ण असणे दलित असणे , गरीब असणे, श्रीमंत असणे एतद्देशीय असणे परप्रांतीय असणे योगायोग असतो. त्या कारणावरून कुणी प्रतिक्रिया देते किंवा नाही असे होत नाही. एक श्रीमंतसुद्धा ठोकरल्या गेल्यावर ठोकरणाऱ्या श्रीमंताला, श्रीमंतीने नादावलेलाच म्हणतो.
आता सकाळच्या लेखाकडे येऊ, ज्यांनी अपघाताची लोकसत्तातील अपघाताची बातमी वाचली त्यांना सकाळच्या प्रस्तुत लेखकाचा लोकसत्त्तातील बातमीकडे रोख असणे नव्हे तर व्यावसायिक आकस असणे आश्चर्याचे वाटू नये.
सकाळच्या लेखातील बहुतांश लेखनाचा समाचार सहमनोगती क्लिंटन यांनी आधीच घेतल्याने क्लिंटनच्या भूमिकेचे समर्थन करून पुनरुक्ती टाळतो.
एक वेगळा मुद्दा असा की सकाळच्या लेखात म्हटले आहे की गरीब आहेत म्हणून फुटपाथावर झोपण्याचा अधिकार आहे का आता आपण असा विचार करू की अपघात दिवसा झाला असता फुटपाथावर ७ मध्यमवर्गीय उभे राहिलेले अपघातात सापडले असते तर कारचे फुटपाथवर जाणे समर्थनीय ठरते का?
अजून एक वेगळा मुद्दा असा की रस्त्यावर गाड्यांची संख्या रात्रीपेक्षा जास्त असते, संख्याशास्त्रीय प्रोबॅबिलीटीज गृहीत धरल्या तर तांत्रिक बिघाडातून गाडी 'रस्त्यावरून फुटपाथावर गेली' या घटना दिवसा अधिक घडायला हव्यात.पण वस्तुस्थिती तशी नसते कारण गाडी रस्त्यावरून फुटपाथावर गेली आणि अपघात झाला या घटना रात्रीच अधिक घडतात आणि यात तांत्रिक बिघाडा पलीकडची शक्यता अधिक संभवते.
श्रीमंताबद्दल गरीबांना असणारा आकस तो तसा असावा की नाही, श्रीमंतीकडे अपराध म्हणून बघावे की नाही हा मुद्दा वेगळा आहे. त्यात सकाळचे लेखक म्हणतात तसे तथ्यही असेलही प्रसार माध्यमांनी ती चूक केलीही असेल.पण असा मुद्दा उपस्थित करण्याची सकाळच्या लेखकाची वेळ, घटनेचे कारुण्य कमी भासवण्याचा प्रयत्न करणारी, असमयोचित आणि म्हणूनच प्रगल्भ वाटत नाही.
संस्कृतात असा श्लोक आहे म्हणतात की ज्या झाडाला फळे येतात ते नम्रतेने अधिक वाकते.तसे ते वाकले तर गरीब लोकही धनिकांना डोक्यावर घेण्याची खूप उदाहरणे आहेत.
एक गरीब वाईट वागतो त्याच्या वाईट वागण्याचे समर्थन करता येत नाही.पण जेव्हा एक श्रीमंत वाईट वागतो तेव्हा त्याच्या कडील साधनांची उपलब्धता अधिक वाईट परिणाम घडवण्यास सक्षम असते.
पब आणि दार्वालयांची अधिक संख्या असलेल्या ब्रिटनमध्ये सुद्धा रात्री उशिरा पर्यंत बार्स ना उघडे ठेवण्याची परवानगी देताना ब्रिटिश पोलिसांच्या कपाळावर भली मोठी आठी असते.
"काय द्याच बोला" नावाच्या चित्रपटात दाखवल्या प्रमाणे कदाचित ह्या घटनेतील तरुण आरोपी कदाचित निर्दोषही असतीलही आणि योग्य न्याय देण्याच काम न्यायालये करतीलच. परंतु माध्यमे लोकशाहीचा आधारस्तंभ अशी आणि कमकुवत समाजाची बाजू घेणारे अशी सुद्धा एक भूमिका असते , या भूमिकांचा काही आजच्या लोकमान्य दैनिकांना विसर पडत आहे, का कुणा जुन्या जाणत्या पत्रकारांचे पुढच्या पिढ्या चालाव्यात म्हणून हि लोकमान्य वृत्तपत्रे स्वस्थ पत्रकारितेकडून स्वस्त पत्रकारितेकडे मार्गक्रमण करत आहेत? या आघाडीच्या माध्यमांनी सामान्यांकडे पाठ फिअरवली तर सामान्यांनी पहायचे कुणाकडे न्याय मागायचा कुठे?
-ऌऋ