1. समाजात वर्ग हे नेहमीच राहणार. सगळे एक सारखे असणे वा तयार करणे हे ब्रम्हदेवाला सुद्धा जमले नाही. त्या वर्गांचा एकमेकांवर द्वेष असणे मला साहजिक वाटते. श्रीमंत नेहमी म्हणतील की यांना आमचे कष्ट, बुद्धी दिसत नाहीत. जे दिसत त्याला हे श्रीमतींचा माज म्हणतात. अन गरीब लोक आपल्या गरिबीसाठी नशिबाला दोष देतात, श्रीमंतांच्या प्रत्येक कृतीला एका नजरेने पाहतात. (हे लिहीत असताना कोणाचे ही समर्थन नाही.)
  2. भारताची राजकारण्यांनी केलेली समाज रचना पाहिली की लगेचच लक्षात येईल की याला कारण कोण?
  3. श्रीमंत लोक कायदा खिशात घालतात असे म्हणाले जाते. कोणालाच कायद्याची भीती नाही याचे कारण कोण?
  4. गरीबांना झोपायला रस्ताच मिळतो त्यांना घरे का नाहीत? त्यांना योग्य वेळी श्रीमंत दिसतात, सरकार दिसते आवाज उठवायला आणि अनेकदा सरकार पण त्यांची बाजू घेते. का? मतपेटीवर डोळा ठेवून. त्यावेळी हेच लोक, चुकलं गरीब लोक प्रलोभना पायी मतदान, बोगस मतदान करतात. प्रत्येकाला मग एकच मत असतं, त्यावेळी कुठे श्रीमंत अन कुठे गरीब? सगळे एकाच हक्काचे असतात. त्यावेळी हा भेदभाव कुठेच येत नाही. की गरीब म्हणून दोन मतं आणि श्रीमंत म्हणून एक?
  5. जर जागरूक होऊन सामाजिक विषयावर सगळ्यांनी मिळून आवाज उठवला तर हि विषमता कुठेतरी कमी होईल.
  6. आम्ही पायाभूत सुविधांवर जास्त खर्च करणार नाही. आमचे सरकार गरीबांसाठी पैसा वाटेल या घोषणे वर भुलून हे लोक मतदान करतात. पण या सरकार वाल्यांना सुद्धा असे वाटत नाही की एकदा का होईना पैसा घालून पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात. जेणे करून लोकांना रस्त्यावर झोपावे लागू नये. असे करून सुद्धा कोणी झोपलेच तर कायदा करून शिक्षा करावी. अन त्यातूनच कोण्या लक्ष्मीपुत्राच्या डोक्यात असे वारे सुटलेच तर तो माणसांवर जाणार नाही. आताच्या या प्रकाराचे खरे दोषी कोण? श्रीमंती, गरिबी, राजकारण की आम्ही सगळेच?
  7. झोपडपट्टीवाल्यांना पक्की घरे दिल्यावर सुद्धा ती घरे भाड्याने देऊन स्वतः नवीन ठिकाणी झोपडी करून गरीब असल्याचे भासवणे हे कितपत बरोबर आहे?
  8. मुळातच या विषमतेला आपण सगळे जबाबदार आहोत. कारण आपण आपल्या पुरते पाहतो. अन मग म्हणत राहतो, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत अन गरीब आणखी गरीब. काय होणार या देशाच?
  9. श्रीमंतां कडून, उच्च मध्यमवर्गीयां कडून  कर घेऊन तो थोडा आपल्या खिशात अन थोडा गरीबांच्या, या सरकारच्या धोरणाने हि विषमता जाणार आहे का?
  10. आपणच जाग झालं पाहिजे अन रस्त्यावर कोणीच झोपलं नाही पाहिजे या साठी जागरूक राहिलं पाहिजे.

तुम्हाला काय वाटत?