माझ्या मते,
मराठी समृद्ध होण्यासाठी आसपासच्या भारतीय भाषांतले शब्द मराठीत यावेत. (तसे ते येतच असतात.) दक्षीण भारतातल्या भाषांत अनेक संस्कृत शब्द अढळतात. आपणही असे शब्द विना तक्रार वापरले तर ते अवघड वाटणार नाहीत. एन्व्हायरमेंट आणि पर्यावरण हे दोनही सारखेच क्लीष्ट आहेत असे वाटते. मग पर्यावरण का नको. (मला तर पर्यावरणापेक्षा साधे वरण आवडते :)
पण प्रत्येक शब्दाचे 'संस्कृत-करण' मला सुद्धा तितकेसे पटत नाही. रेस्टॉरंट (मूळ फ्रेंच रेस्तराँ ?) असे शब्द मराठीत रूढ झाले तरी ठीक.

इंग्रजी शब्द वापरणे ही अभिव्यक्तीची निकड असेल तर ठीक पण केवळ भपका म्हणून बरेचदा तसे वापरले जाते म्हणून अनेकदा त्याला विरोध होतो. 
इंग्रजी शब्द घ्यायचे असतील तर ते अशा वस्तूंचे घ्यावेत की ज्या मूळातच इंग्रजी प्रदेशातील आहेत. उदा. फोन. पण घोंगडीला रग किंवा ब्लँकेट म्हणू नये. असे वाटते.
--लिखाळ.