मी पणाची जाणीव म्हणजेच अहंकार असे मला वाटते. सकाळी जाग आल्यावर मी उठलो असे जे वाटते तो अहंकार. तो सर्वांतच असतो. त्या मुळे राग, लोभ, मत्सर, म्हणजेच 'हवे-नको पणा' निर्माण होतच असतात. त्यावर ताबा मिळवणे आणि हळूहळू मी पणाची जाणीव कमी करणे, आणि शेवटी 'मी तोच आहे' अथवा 'आहे' इथपर्यंत प्रवास करणे, या साठी संतांनी काही उपाय सांगितले आहेत. असा प्रयत्न करताना, थोडक्यात अध्यात्मात प्रगती करून घेताना, केवळ अहंकाराचे प्रमाण हेच एक उन्नतीचे परिमाण आहे. तेथे कलागुण, सामाजिक प्रतिष्ठा यांचा काही उपयोग नाही. असे वरील विवेचनातून वाटले.

तुकारामांसारखे पूर्ण शरणागत आणि लीन झाल्यास मॅनेजरची नोकरी मिळणार नाही कदाचित पण त्यांना मिळाले तसे 'पूर्ण स्वातंत्र्य' (मुक्ती) मिळेल असेच संतांच्या या वचनातून त्यांना सुचवायचे आहे असे वाटते.

--- (मूढमती) लिखाळ.