हे संस्कृत शब्द घुसवण्यावरून एक मुद्दा लक्षात येतो. शाळेत अ,ब,क,ड* हे वर्ग होते. वर्गवारी कशी होते ते वेगळे सांगण्याची गरज वाटत नाही. प्रत्येक वर्गात ५० मुले या हिशेबाने एका इयत्तेत २०० मुले असावीत. पैकी केवळ अ वर्गाला संस्कृत शिकवले जाई, बाकीच्या वर्गांना ते झेपणार नाही हे समजून. म्हणजे केवळ १/४ मुलांना संस्कृत शिकवले जाई. आता अ वर्गातील ५० पोरांना संस्कृत मनापासून येत होते यातला भाग नाही. माझ्यासारखे देव: - देवौ- देवा: असे उत्तरपत्रिकेपुरते घोकणारे बरेच होते. म्हणजे जर ५० पैकी१/४ शोधले तर १२-१३ मुलांना संस्कृत कळत असावे. (१२-१३ या आकड्यावर एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे.) पुढे या १२-१३ तील एक मुलगी आयुर्वेदाकडे वळली. (ऍलोपथीला प्रवेश न मिळाल्याने.)

या ब,क,ड वर्गातल्या मुलांना इंग्रजी शिकवले जात होते, ती किचकट भाषा म्हणून टाळली जात नव्हती. प्रश्न असा की जर ३/४ मुलांना संस्कृत भाषा इंग्रजी भाषेपेक्षाही परकी वाटेल तर मूठभर १/४ तल्या १/४ माणसांनी त्या भाषेतील शब्द बहुजनांवर का लादावेत?

यात इंग्रजी शब्दाला मराठी प्रतीशब्द शोधू नये असे मुळीच नाही. शोधावेत जरूर; पण त्याला सुटसुटीतपणा नको का? Compact Disk ला इंग्रजीत फक्त CD म्हटले जाते. आम्ही शब्द शोधताना सहसा ४ अक्षरांच्या खाली येऊच शकत नाही (चू. भू. दे. घे.)

* अ,ब,क,ड (A,B,C,D) तुकड्या