मराठी समृद्ध होण्यासाठी आसपासच्या भारतीय भाषांतले शब्द मराठीत यावेत. (तसे ते येतच असतात.)
सहमत. आणि 'हिंदीचे आक्रमण होते आहे हिंदीचे आक्रमण होते आहे' असे आम्ही कितीही बोबंललो तरी त्यांचे येणे थांबवता येणार नाही. म्हणून त्यांना आत घेतलेले बरे.

इंग्रजी शब्द वापरणे ही अभिव्यक्तीची निकड असेल तर ठीक पण केवळ भपका म्हणून बरेचदा तसे वापरले जाते म्हणून अनेकदा त्याला विरोध होतो.
खरे आहे.

इंग्रजी शब्द घ्यायचे असतील तर ते अशा वस्तूंचे घ्यावेत की ज्या मूळातच इंग्रजी प्रदेशातील आहेत. उदा. फोन. पण घोंगडीला रग किंवा ब्लँकेट म्हणू नये. असे वाटते.
अगदी पटले.