श्रीमंत तेवढे दुर्जन व मस्तीखोर आणि गरीब तेवढे सज्जन व सालस हा समाजवादी नपुंसक द्वेषाचा खोटा प्रचार आहे. गरिबांमध्येही मस्ती व दुर्जनता असते आणि अनेक श्रीमंतही सज्जन व सालस असतात. हे मानवी गुण वा दुर्गण आहेत; त्यांचा श्रीमंत वा गरिबीशी काही संबंध नाही. काहींना त्यागाचीही मस्ती असते; त्याचाही मग ते चांगला धंदा करतातच! माणसं श्रीमंत झाली नसती, तर "श्रीमंतीची मस्ती', "धनिकाचे पराक्रम' वगैरे व्यक्त करणारी माध्यमं निर्माण झाली नसती. हे एकच उदाहरण श्रीमंती ही सृजनशील आणि लोकशाहीवादी आहे हे दाखवायला पुरेसं आहे.
सहमत. गुण दोष ही कोणा एका जातीची, गटाची, वर्गाची मक्तेदारी नाही.
तरीही..... एखाद्याने पुढील विचार करावा.
१. भारतात 'टोयोटा' करोला ही गाडी मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करते असे वाटत नाही. उच्च मध्यमवर्गियांचे करत असावी कदाचित. अशा गाडीत सुमारे ६-७ जण त्यात एक मुलगीही होती. कोंबून का बसले असावेत या बाबत अनेक निष्कर्ष काढता येतात.
२.१८-२१ या वयोगटातील ही मुले नक्की किती कमवत असावीत? मला वाटते या वयोगटातील मुले कॉलेजला जातात, शिकायला(?) अशा मुलांच्या हातात टोयोटा करोला येऊ शकते, महागड्या पार्ट्यांना प्रवेश मिळू शकतो. सदर पार्टीचे शुल्क प्रत्येकी १२०० रू. असून खाण्या-पिण्यासाठी वेगळे पैसे भरावे लागत होते असे वाचले आहे. (अवांतर: गेल्या वर्षी मुंबईत मुद्दाम निरीक्षण केले असता, हाय-वे वरील २५ गाड्यांपैकी एक मर्सिडिज आहे.)
३. या वयांच्या मुलांवर आई-बापांचे नियंत्रण नको का? म्हणजे ती काय करतात? कोठे जातात? घरी कधी परततात? पहाटे साडे तीन ही १८-२१ वयोगटातल्या मुलांची 'पार्टीतून' घरी परतण्याची वेळ आहे का?
४. सलमान खान, रवी म्हात्रे, मनीष खटाव हे सामान्य मध्यमवर्गीय घरातून येतात का? समाजाने यांचा संदर्भ घेऊन या मुलांनाही श्रीमंत ठरवले तर कितीसे चूक आहे?
५. ज्यांच्या गाड्यांत बिघाड होतात ते गाडी सुरक्षित ठिकाणी नेऊन थांबवतात की फूटपाथवर चढवतात?
यांतली कोणतीही गोष्ट माझ्या घरात होत नाही, झालेली नाही. यांतील कोणतीही माणसे माझ्या आजूबाजूच्या समाजात अद्याप राहत नाहीत, मी त्यांना ओळखत नाही, त्यामुळे मला ती श्रीमंत असावीत असेच वाटते. ही माझी चूक असू शकते; पण सहज प्रतिक्रिया अशीच होते.
आता मूळ लेखाकडे पाहू...
त्या मुलांनी दारू प्यायली म्हणजे अपघाताचं कारण ते आणि तेच आहे, असा निकाल माध्यमं आणि स्वयंसेवी संस्था कसा काय घेऊ शकतात?
हास्यास्पद! मद्याधुंदावस्थेत गाडी चालवणे हा गुन्हा आहे हे माहित असून स्टिअरिंग व्हिलच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीबद्दल पूरक भाष्य करणे हा विनोद आहे.
फूटपाथ ही झोपण्याची हक्काची जागा आहे, असं आपण सर्वांनी मान्य केलं आहे की काय,
झोपायला हक्काचे छप्पर असेल तर माणसे खुशीने फूटपाथवर झोपतील का? याला जबाबदार केवळ झोपणारे नसून संपूर्ण यंत्रणा आहे.
या अपघातात "समाजवादी गरिबां'प्रमाणे चर्चही पुढे आलं आणि एका इंग्रजी दैनिकात ती मुलं ख्रिश्चन असली तरी त्यांना पाठीशी घालणार नाही, अशी चर्चनं प्रतिक्रिया दिली. आता चर्चचं हे काम आहे का?
हे बाकी खरे.