सौ अबोली व कांचन,

भाकरीची पाककृती मी पाककृती मध्ये स्थलांतरित केली आहे. तिथे श्री प्रभाकर पेठकर ह्यांनी सविस्तर टीपा दिल्या आहेत.

सौ अबोली, मी आणलेले पीठही खूप जुने असल्याने भाकरी मोडत होत्या, त्यात थोडे गव्हाचे पीठ घालून करतात असे माझ्या एका मनोगती मैत्रिणीने सांगितले, पण तसा प्रयोग केला नाही.

कांचन, ज्वारीची भाकरी थंड असल्यामुळे त्यात थोडे बाजरी पीठ मिसळावे हे बरोबर आहे. ज्वारीची भाकरी ही उन्हाळ्यात खाल्ली तर चालते. खरे तर बाजरी न मिसळता ज्वारीची भाकरी १२ महिने खाल्ली तरी शरीराला अपाय होत नाही, फक्त खूप थंडीत मात्र फक्त बाजरीचीच भाकरी खावी असे म्हणतात.

रोहिणी