वरील चर्चेत किंवा या विषयावरच्या चर्चेत कधी कधी असा सूर असतो की याचे एक कारण हे झोपडपट्टी किंवा पादचारीमार्गावर राहाणारे लोक असतात. आता खाली लिहीत असलेला सत्यप्रसंग पहा:
साधारण १९९४ सालातली गोष्ट. तेंव्हा गाड्या इतक्या वाढलेल्या नव्हत्या. मारूतीचे अजून एकमेव प्रस्थ होते. माझ्या नात्यातील मध्यमवयीन व्यक्ती. स्थळ: पिंपरी/चिंचवड परीसर. सायकल की मोपेड प्रकारच्या वाहनावरून बाजूने जात असताना, एक मारूती मोटार समोरून आली आणि पाडले. त्या गाडीतला १६-१८ वयोगटातला मुलगा थांबला ही नाही, पण घाबरून जाताना पायावरून गाडी नेली. हा प्रसंग या व्यक्तीच्या घराजवळच झाला आणि अजून एका बंगल्यातील बाईने ते पाहीले. पळत आली आणि डॉ. आणि नंतर इस्पितळात नेले....२-३ वर्षांनंतर एक पाय पावला खालच्या बाजूने कापलेला असल्याने लंगडत का होईना चालू शकते....
मुलाकडे अर्थातच लायसन्स नव्हते... आणि ह्या व्यक्तीचा तर बंगला, पादचारीमार्गावर राहणारी अथवा झोपडपट्टीतील नव्हे..
बाकी शिक्षा लांब, ज्या गोष्टि काल झाल्या त्यातील व्यक्तीचे अथवा सलमानाचे लायसन्स तरी जप्त झाले आहे का?
आपले कायदे, ते सांभाळणाऱ्या संस्था आणि त्या सांभाळतात का ते पाहाणारे जागरूक नागरीक यांची सर्वांचीच आज गरज आहे.