माझे वडील एकदा पादचाऱ्यांना हिरवा सिग्नल असताना रस्ता ओलांडायला लागले असताना, एक दुचाकीवाला त्याला लाल सिग्नल असतानाही सिग्नल तोडायच्या हिशेबाने, जोरात आला, आणि कसाबसा थांबला. माझे वडील त्याला बोलले, "अरे असा कसा काय येत होतास, मला किंवा अजून इतरांना, लागले असते ना", त्याचे उत्तर " अहो पण लागले का?". वैतागून माझ्या वडीलांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलीसाला विचारले की " असे कसे लोकांना लाल सिग्नल असून, पुढे येऊन देतोस आणि लक्ष देत नाहीस?", त्याने ही शांतपणे तोच प्रश्न विचारला की "पण साहेब कुणाला लागले का?, मग काय बिघडले?"

तात्पर्य: आपल्या लोकांना आणि सरकारला काळजी घेऊन वेळीच अपघात टाळण्या ऐवजी, पंचनामा करणेच आणि नंतर "केस गुंडाळणे" बरोबर वाटते असावे...