अनुताई, आपला लेख आणि लेखनशैली दोन्ही आवडले.
'हा प्रोग्रॅम माझं बाळ आहे(इटस माय क्रिएशन.) शेवटी किती झालं तरी आपला तो बाब्या! सगळं व्यवस्थित होईल. चूक सापडेल. आणि नाही सापडली तर उद्या सापडेल.कूल, मॅन!' असं म्हणून मन ठिकाणावर येतं. आंतरजालाची मोहवणारी खिडकी बंद करून आणि घरच्या छान चहाची तल्लफ बाजूला सारून कडवट कॉफीचे गुटके घेत हात परत आज्ञा खिडकीत टंकू लागतात!
वा! झकास लेख ! असंगणकीय लोकांच्या आपल्याला शुभेच्छा.
आपले नावच अनु असल्याने अनुदिनी सहजतेने आली असावी.