राजू परुळेकरांचे लिखाण म्हणजे काहीतरी मौलिक लिहिण्याच्या (प्रोफाउंड) आविर्भावात केलेले तद्दन बाजारू लिखाण आहे. संपत्तीची निर्मितीची वृत्ती ही समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे, फूटपाथवर झोपणे बेकायदेशीर आहे , चर्चचा इतिहास रक्तरंजित आहे अशा ढोबळ सत्यांचा किती खुबीने त्यांनी त्या दुसऱ्या माणसाच्या आयुष्याला काडीइतकी किंमत न देणाऱ्या बेजबाबदार प्रवृत्तींची तळी उचलून धरण्याकरता वापर केला आहे पहा. एकीकडे ते म्हणतात "कशावरून हे लोक श्रीमंत आहेत?" दुसरीकडे म्हणतात "बिच्चारे श्रीमंत !".