अनिलकुमारांनी अगदी योग्यच मांडले आहे त्यांचे म्हणणे.फक्त परिस्थितीनुसार 'आपल्या माणसाची'व्याख्या बदलते असे मला वाटते.
गेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या किंडरगार्टेनमध्ये एका जर्मन सन्ताच्या नावाने सर्व मुले आणि पालक-शिक्षक यांची एक मिरवणूक होती.मीही त्यात सामील झाले होते.तो सोहळा,त्याची पद्धत आणि तेव्हा गायली जाणारी गाणी हे सर्वच मला अतिशय नवीन होते.ते मी मनापासून अनुभवले खरे! पण हे आपले नाही- ह्या सर्व समूहात आपण नवे आणि म्हणून एकटे आहोत हेही तितकेच मनापासून जाणवले.अशावेळी सुद्धा कोणीतरी आपले माणूस बरोबर असावे असे फार वाटले!म्हणजे आपल्याशी संवाद साधेल असे कोणीही ते आपले अशी व्याख्या त्या क्षणी मी केली.तुम्हाला काय वाटते?