व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
व्याकुळलेली सारी सृषटी
प्रेमघनाची कुठे न वृष्टी
वातावरण हे नवे आज
सृषटी ल्याली नवा साज़
पण जुने, शिळे मनातले भाव
तीच चुकलेली वाट अन तोच प्रीतीचा गाव
असाच माहोल होता मागच्या वर्षी
असेच सूर अन असेच पक्षी
पूर्वार्धात असाच रंगला शृंगार
पण उतरार्ध मात्र होता टुकार
गेली ती देऊन 'नकार'
जणू केला एक जोरदार प्रहार
जखम जरी भरली तरी
मिटला नाही तो व्रण
करू नकोस पुनरावृत्ती
तू तरी 'हो' म्हण
लग्नानंतर लागू दे वाट
पण आज जगायचेत हे क्षण
नको करूस निराश आता
मला तू फक्त 'हो' म्हण