खरे म्हणजे मागचा लेख वाचताना कचऱ्याचे वर्णन आणि बुरसटलेली पिझ्झा स्लाइस वगैरे वाचुन अगदी तोंडावर आले होते की "बाळा, अशा कचऱ्यात राहणे आरोग्याला घातक असते." आणि "टोमॅटो प्युरीचे कॅन्स, अंड्याची टरफले अशा प्रकारचा कचरा घेऊन बसवते तरी कसे तुला त्या खोलीत?" असेही विचारावेसे वाटले. पण त्यातून आपले आता वय झाले आहे या गोष्टीचा साक्षात्कार झाला आणि गप्प बसले, झालं! ;)
हे अगदी आईचे संवाद बोललात बघा! (विशेषतः ठळकावलेला भाग) ;) :D
(तेवढे कचऱ्याचे बघा बुवा जमल्यास. :P)
हा लेख मनोगतावर तसेच माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केल्यावर त्याला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून ज़रा हुरळून गेलो आणि घरसोबत्यांना लेख वाचायला दिला. आम्हा ४ ज़णांपैकी ३ ज़ण मराठी आणि चौथ्या अमराठी सोबत्यास आमच्यामुळे चांगलेच मराठी येते. त्यामुळे लेख, त्यामागची भावना/उद्विग्नता त्यांनाही समज़ली. काल घरी आल्यावर मी ज़मा झालेल्या कचऱ्याचा फ़ोटो काढला आणि तो ब्लॉगवर तसेच या लेखमालेच्या उपसंहाराच्या भागात चिकटवणार असल्याचे जाहीर केले. दुसऱ्या मिनिटाला सगळ्या कचऱ्याच्या एका भल्यामोठ्या पिशवीत मुसक्या बांधून त्याची योग्य ठिकाणी रवानगी झाल्याचे पहायला मिळाले. "जनाची नव्हे तर निदान मनाची ठेवावी" ही म्हण उलटून "मनाची नाही, पण जनाची ठेवतो" झाल्याचे पाहण्यात आले ;)
प्रतिसादाबद्दल मन: पूर्वक आभार