लेख छान आहे. आवडला.
अवांतर आठवण - ऍश्ली विल्सन नावाची माझी अमेरिकन ई-पत्र मैत्रीण होती एक वर्षभर. मी इयत्ता अकरावीमध्ये असताना. तिला भारतातील ताजमहाल ही एकच गोष्ट माहीत होती. आणि मी मुंबईत असूनही ताजमहाल माझ्या घरासमोरच आहे, असे तिला बिनधास्त सांगितले होते. इतकेच नव्हे, तर ती भारतात येईल किंवा मी अमेरिकेत ज़ाईन तेव्हा आपण एकमेकांना भेटायचेच असेही ठरले होते. पण साधारण वर्षभराने 'बारावी' नामक एका दुष्टाव्याने पत्रव्यवहार बारगळला आणि ऍश्ली माझ्याकडून हरवली. तिला शोधता येणे शक्य आहे का, असल्यास कसे, हे पाहतोय.