प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

विशेष आवडले. यांपैकी तिसरा ज़रा जास्त सरळसोट वाटतो आहे.

मराठी गझल कालानुरूप आणि विषयानुरूप स्वतःला बदलत असली, तरी सिगार सारखे संदर्भ खूपच क्रांतिकारी वाटतात (मला तरी!) आधुनिक संदर्भांमध्ये होणारे असे स्थित्यंतर जितके सहज़ होईल तितके सुखावह असेल, असे वाटते.

पुढील लेखनासाठी मन: पूर्वक शुभेच्छा.