"त्यांची संस्कृती सुद्धा आपल्या संस्कृतीवर प्रभाव टाकू शकेल का? "

नितीन राव आपल्या प्रश्नातील एवढाच भाग वेगळा काढला की प्रश्नाच स्वरूप बदलत ते अत्यंत व्यापक आणि वेगळ्या चर्चेची आवश्यकता असलेल आहे. या चर्चेचे विषयांतर नको म्हणून मर्यादीत स्वरूपावर(अस्पेक्ट) मत व्यक्त करणे ठीक राहील.

""परकीय भाषे सोबत त्यांची संस्कृती सुद्धा आपल्या संस्कृतीवर प्रभाव टाकू शकेल का?"

भाषेच्या देवाण घेवाणीने दोन्ही दिशांनी अंशतः असा प्रभाव पडणे सहाजिक आहे, पण यांस भाषा किंवा तीच्यात होऊ घातलेले बदल जबाबदार नसतात.भाषा फक्त एक साधन असते. आजच्या मराठीत असंख्य अरबी शब्द आहेत म्हणजे त्या भाषेने आमची संस्कृती प्रभावित केली असे म्हणने सयुक्तिक वाटत नाही‌ संस्कृती प्रभावित होण्याची कारणे इतरत्र असतात असे माझे मत आहे.

आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

-विकिकर