व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
अतृप्त माझी सृष्टी सारी
मिलनाची आस न्यारी
कळी कळी उमलणार आहे
पाकळी पाकळी रंगणार आहे
केसर केसर दरवळणार आहे
भृंगराजां सवे शेजणार आहे
दवबिंदुंनी भिजून जाईन
लते सारखी बिलगून घेईन
तेव्हा हि कविता
सोबत लिहू
सुगंधाने वेडावून जाऊ
परागकण ओठांवरचे
घेऊन टाक
ओठांवरचे परागकण
माझ्या अंतःकरणात ओतून टाक
मऊ,मऊ
लुसलुशीत
गोड गुलाबी होऊन
येना कुशीत
खुस खुशीत
राणी ही कवेत घे
बस्स एक चुंबन दे
मलमलीत माझ्या
गुरफटून घेईन
प्रेम ते अवीट देईन
गुलामावर स्वार होऊन
लगाम माझ्या हातात घेईन
चौफेर उधळेन
अश्व तुझा
फिरवून बघेन
गुलामाशी गट्टीकरेन
झिम्मा खेळेन ओथंबून
हुतुतू, आट्यापाट्या भिंगोऱ्या,
फुगडी,अन दोरी वरच्या उड्या,
लंगडी घालत
रंगात तुझ्या न्हाऊ घाल
आतुर राणी आतुर मन
आतुर आहे, प्रत्येक क्षण
...मला तू फक्त 'हो' म्हण !