खूपच हृदयस्पर्शी लेख. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काळ कसा भरभर बदलतो आहे?
१५ वर्षापूर्वी आमच्या ओळखीची एक मुलगी परदेशी गेली. दर रविवारी आय. एस. डी. वर बोलणे ठरलेले. आई, बाबा यांचा आवाज ऐकल्यानंतर कुत्राचे भुंकणेसुद्धा ऐकायला आतुर.
७-८ वर्षापूर्वी इंटरनेटवर कीबोर्डद्वारे चॅटिंग करायची धडपड.
त्यानंतर वेबकॅम आला आणि मूर्तिमन्त चेहरा स्क्रीनवर दिसायला लागला.
आवाजाच्या ट्रान्स्मिशनचा वेग वाढला आणि इंटरनेटवर टेलीफोनसारखे बोलता येऊ लागले.
टेलीकॉन्फरन्सिंग सुरू झाले आणि एकाच वेळी निरनिराळ्या देशात असलेल्या आप्तांचे चेहरे दिसू लागले व एकमेकाशी बोलता येऊ लागले.
आता वाईड बँड आल्यावर फोनपासून स्वतंत्र संपर्क होऊ लागला. आता शेजाऱ्याला फोन करण्याची गरज उरली नाही.