आरक्षणाविषयी प्रत्येकवेळीच बौद्धसमाजाविषयी बोलले जाते असे नाही. त्या त्या वेळी जो समाज समोर असेल त्याबद्दल बोलले जाते. उदा. ओ. बी. सी. आरक्षण आल्यावर ओ. बी. सीं. विषयी बोलले जाते.
तरीही बऱ्याचदा आपण म्हणता तसे या गोष्टीची कारणे दोन आहेत--
१. डॉ. आंबेडकरांसारखे प्रभावी नेतृत्व काही काळासाठी तरी मिळाल्याने हा समाज बराचसा एकसंध आहे आणि नेमके कुठे जायचे याची बऱ्यापैकी जाणीव या समाजाला झाली आहे. साहजिकच, इतर एस. सी., एस. टी. लोकांच्या मानाने किंवा काही ओ. बी. सी. समजल्या जाणाऱ्या(हो, "समजल्या जाणाऱ्या" हा शब्दच योग्य आहे कारण काही ठिकाणी यांचे हाल आदिवासींपेक्षा जास्त आहेत) जास्त प्रगती केली आहे.
२. बऱ्याच लोकांना या समाजाविषयी आकस असण्याचे मुख्य कारण म्हणजे हा समाज हिंदुधर्म सोडून बौद्धधर्मात गेला. एवीतेवी तुम्ही आमचा धर्म सोडलाच आहे तर त्यातल्या एका जातीचे नाव सांगून आरक्षण का मागता हा ही आक्षेप असतोच.
साती