एकदाही रक्त न दिल्याने या चर्चेत लिहिण्याची मला लाजच वाटते आहे

मृदुला, तुला असं वाटायची गरज नाही. तुला रक्त द्यावंसं वाटतं आणि ते देण्याचा तू प्रयत्न करतेस हेच महत्त्वाचे आहे. आणि हो मी सुद्धा आत्तापर्यंत एकदाही रक्तदान करू शकले नाही. पूर्वी वजन कमी आणि हिमोग्लोबिन कमी होतं म्हणून आणि आत्ता हिमोग्लोबिन तर कमी आहेच त्यात व्हायवॅक्स मलेरिया नुकताच होऊन गेल्याने अजून काही महिने हिमोग्लोबिन वाढले तरी रक्त देता येणार नाही.

नाम्या, अत्यानंद आपले रक्तदान केल्याबद्दल अभिनंदन!

मृदुला, अगं काही आजारात काही ठराविक रक्तघटकांचीच जरूरी असते. हे घटक एक एकक(युनिट) रक्तात असतात त्यापेक्षा कितीतरी संहत प्रमाणात द्यावे लागतात. त्यामुळे नुसते रक्त काहीवेळा देता येत नाही. दुसऱ्याचे रक्त हे कितीही मॅच केलेले असले तरी आपल्या शरीरात तो परकीय पदार्थ असतो आणि हानी निर्माण करू शकतो. त्यामुळे शक्यतो रक्त द्यायची वेळच पडू नये, पडल्यास अगदी आवश्यक तोच घटक द्यावा अशी पद्धत आहे.

रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट हे बरोबर पण जुना तंतूकणिका हा शब्द प्लेटलेटचे कार्य योग्यप्रकारे व्यक्त करतो. प्लेटलेट रक्ताची गुठळी करण्यास उपयुक्त असते हे खरेच पण रक्ताची गुठळी करणारे घटक clotting factors हे तेरा प्रकार लई डेंजरस आहेत. एकएका प्रकाराअभावी एकएक भयानक आणि महागडा रोग होतो.

नाम्या, तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर लवकरच देण्याचा प्रयत्न करते.

निरोगी पुरूष दर ३ महिन्यांनी आणि निरोगी स्त्रिया दर चार महिन्यांनी रक्तदान करू शकतात.

                                                                साती