>> या विषयातील घोर अज्ञानामुळे भरपूर चुका असण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावाची खरे तर काही गरज नव्हती. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की.,,
राजहंसाचें चालणें| भूतळीं जालिया शाहाणें| आणिकें काय कोणें| चालावेचिना ?
अध्याय १८ - १७१४
राजहंसाचे चालणे सुंदर हे मान्य पण म्हणून इतरांनी चालूच नये की काय?
त्याप्रमाणे जाणकारांचा अभ्यास मोठा म्हणून आपण लिहू नये असे थोडेच आहे?
आपण निवडलेला विषय उत्तम आहे कारण अहंकारनाश हाच गीतेचा संदेश आहे असे काही विद्वानांचे मत आहे.
>> बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ।
अरेच्च्या! पण हे काय? हा तर पूर्वरंग झाला. उत्तररंगासाठी शुभेच्छा.