वा, वा. मला ही कविता फारच आवडली आहे. पहिली आवृत्तीच. (दुसऱ्या आवृत्तीच काही गरज नव्हती:):) सरल्येच्या ऐवजी सरलीय केल्यास कसे?
अजून उजाडलेला नाही उद्याचा दिवस
अजून पुरता फिटायचाय बोललेला नवस
अजून एकदा जीव ओवाळून टाकू दे..
मग लिहीन की कविता..
मग लिहीन की कविता मधला जो लहजा आहे तो फार-फार आवडला. तुमची ही आणि एकदाच ही कविता वाचून मला परवीन शाकिर आठवते. जोम, उत्कटता तीच. इतकी सुरेख कविता इथे दिल्याबद्दल आभारी आहे.