योग्य जेवण मिळण्याची पुरती वाट लागलेली असल्याने ( खरं तर माझी नाटकं खूप आवडत्या जेवणाबद्दलची त्यामुळे ) माझं हिमोग्लोबिन आवश्यक प्रमाणासंदर्भात तळ्यात-मळ्यात खेळत असतं आजकाल. सद्ध्या मी हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात आणण्यासाठीच आवश्यक प्रयत्न करते आहे. शेवटच्या दोन वेळेस रक्तदान करायला गेले तेव्हा या कारणाने नाकारलं गेलं.. तीव्र संताप आला माझा मलाच.

वर्षातून किमान ३ वेळेस तरी रक्तदान करायचा माझा नियम तुटला यावेळेस.. :,(

माझा रक्तगट ओ+ आहे. मी १ महिन्यात स्वतःला पुन्हा एकदा पात्र करून घेईन रक्त/प्लेटलेट्स दानाकरता. तोपर्यंत क्षमस्व.

रक्त/प्लेटलेट्स दानाकरता जे कोणी यादी बनवत असतील, कृपया माझे नाव तुमच्याकडे नोंदवून घ्या. मी अपात्र ठरू नये याची मी यापुढे नक्की काळजी घेईन.