मृदुला यांस,

आपले म्हणणे रास्त आहे. सतत दारे-खिडक्या बंद केल्याने वाताभिसरण होणार नाही. परंतु आपल्याला इतकी प्रतिबंधक कृती करावयाची नाही.
मी पुढील भागात फायरवॉलबद्दल लिहीणारच आहे, इथे थोडक्यात सांगतो (दारे-खिडक्या भाषेत :-).
फायरवॉल म्हणजे आपल्या सर्व दारे खिडक्यांसाठी नेमलेला सुरक्षारक्षक आहे. सर्वप्रथम हा सर्वच दारे खिडक्या सर्वांसाठीच (तुमच्यासकट) बंद करतो. यानंतर जेव्हा तुमच्या घरातील कोणाला बाहेर जाण्याची गरज पडते, तेव्हा तो तुम्हाला परवानगी विचारतो. तुम्ही त्याला "नाही", "कधीच नाही", "हो" आणि "कायमच हो" अश्या प्रकारे उत्तरे देऊ शकता.

आता आपण Internet Explorer चं उदाहरण घेऊया. तुम्ही तो चालू केल्यावर अर्थातच तो इंटरनेट ला जोडू पहातो. यावेळी ही फायरवॉल तुम्हाला परवानगी विचारते - "Internet Explorer ला बाहेर जाण्यास परवानगी देऊ का?". तुम्ही "नाही" म्हणालात, तर तुमचा Internet Explorer इंटरनेट ला जोडू शकणार नाही. तुम्ही "कधीच नाही" म्हणलात तर फायरवॉल ते लक्षात ठेवेल. आणि कधीच त्यास जोडू देणार नाही. तुम्ही हो म्हणालात तर Internet Explorer स्वतःस इंटरनेट ला जोडू शकेल, आणि तुम्ही "कायमच हो" म्हणालात तर यापुढे फायरवॉल तुम्हास नं विचारता कायमच Internet Explorerला जोडू देईल.

या पद्धतीने आपण प्रथम फायरवॉलला एकदा सांगितले की मग प्रत्येक वेळी आपल्याला सांगत बसावे लागत नाही. तसेच या सगळ्याची माहिती फायरवॉल ठेवून देते, त्यामुळे आपल्याला कोणाला कधी अडवले हे कळू शकते.

मी माझ्या संगणकावर "Internet Explorer", "Yahoo messenger" इत्यादींसाठी "कायमच हो" सांगून ठेवले आहे.

अमित चितळे