साती, नुसत्या प्लेटलेट देण्याऐवजी रक्त आख्खेच का नाही चालत?
माझी माहिती (कदाचित अपुरी जाणकारांनी मदत करा)
१. प्लेट्लेट्स चा रक्तातील आकडा लाखांच्या घरात असतो. डेंग्यू , मलेरिया अश्या काही रोगांमध्ये हा आकडा घसरतो व हजारांच्या घरात जातो.
२. हा आकडा कमी झाल्यास व रक्तस्त्राव झाल्यास रक्त गोठण्याची प्रक्रिया संथ होते व रक्तस्त्राव थांबत नाही
३. नुसतेच रक्त दिले तर त्यांतून मिळणाऱ्या प्लेटलेट्स कमी असतात. म्हणून नुसते रक्त चालत नाही.
अजून थोडी माहिती:
१. प्लेटलेट्स दानाची प्रक्रिया दोन अथवा एक हात वापरून करता येते.
२. या प्रक्रियेस साधारण ५० - ६५ मिनिटे लागतात.
३. प्लेटलेट्स सर्वांना दान करता येत नाहीत. त्यासाठी आपल्या हाताच्या शिरा स्पष्ट दिसणाऱ्या हव्यात.
४. pleTaleTsa देणाऱ्याचे रक्त आणि घेणाऱ्याचे रक्त crossmatch (मराठी शब्द सुचलानाही लगेच :) ) करावे लागते.
५. ज्या लोकांना प्लेटलेट्स देता येतात त्यांना मी भाग्यवान समजतो.
आणि अश्या लोकांमध्ये मी पण आहे याचा मला अभिमान आहे. मी स्वतः ६ वेळा प्लेट्लेट्स दिल्या आहेत.
वरील माहीती मध्ये काही चुका असू शकतात कृपया जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी.
चिकू