महाराष्ट्रातील बौद्ध समाज (किंवा महार समाज) हा एकसंध असण्यामागची अनेक कारणे आहेत. त्यातली काही सातींनी दिलेली आहे. हा समाज मातंग आणि इतर समाजांपेक्षा ह्या समाजाची संख्या महाराष्ट्रात कितीतरी अधिक आहे. त्यामुळेही राजकीय महत्त्व इतर जातींपेक्षा जास्त. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारही इतर दलित जातींपेक्षा कितीतरी जास्त झाला आहे.

 सरकारी नोकऱ्यांतदेखील ह्या समाजाचे प्रमाण अधिक आहे. ह्या समाजातही पोट-जातिवाद नव्हता असे नाही. पण तो आता बराच कमी झाला आहे. 'बावने' आणि 'सोमोस' ह्या विदर्भातल्या महार समाजांतल्या दोन पोटजाती. ह्यांत आधी रोटी-बेटी व्यवहार होत नसे.

बौद्धांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांत आरक्षण नाही. ह्याच कारणामुळे माझ्या माहितीतले  अनेक जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी ते कागदोपत्री हिंदू आहेत.

पण ह्यामागे कारणे अनेक असावीत. इतर दलित जातींचा दबाव हेदेखील एक कारण असावे. कारण वस्तुस्थिती अशी आहे की हा समाज सरकारी नोकऱ्यांतले त्यांचे  आणि  शिक्षणाच्या बाबतीत इतर जातींपेक्षा बराच आघाडीवर आहे. 'ह्या समाजालाच सगळ्या संधी, नोकऱ्या, फायदे मिळाले. आमच्या समाजाला काही फारसे मिळाले नाही,' अशी भावना मातंग समाजात आहे. पण आता इतर जातीही बौद्ध धर्माचा स्वीकार करीत आहेत. असे असले तरी 'बौद्ध' म्हणजे 'महार' असेच लोक समजतात.

एक खास करून नमूद करावेसे वाटते की, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ह्या समाजाने आवाज उठविला होता. खरे तर त्यांना मंडल आयोगाच्या आरक्षणाचा काहीच फायदा होणार नव्हता. पण तरीही ओबीसींना ह्याची जाणीव नाही.

चित्तरंजन