प्रिय वैभव,
माझ्याजवळ प्रशंसा करायला शब्द नाहीत, अपुरे पडताहेत. गझलेतुन भक्ती-भाव व्यक्त करणे हे शिव-धनुष्य तु सहज पेलले आहेस,..भक्त आणि परमेश्वरातील हे अद्वैत खऱ्या अर्थाने साकार झाले आहे..आणि खरे सांगतो 'जगणे हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही' ह्यानंतर ही भावावस्था अपेक्षितच होती..in fact ही नंतरची पायरी आहे..ती कवीच्या काव्य-प्रवासात कधी ना कधी येतेच.. ह्याला बोरकर, पाडगावकर, ..कोणीही अपवाद नाही. हयानंतर तुझी कविता अधिक प्रगल्भ व्हावी ही मनोकामना!
असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते
सहज तुझे नाव घेतले श्वास श्वास हा बेफिकीर झाला .. उंची गाठलेला शेर
-मानस६