माझ्या आजीच्या दोन्ही शस्त्रक्रियांच्या वेळेस मी रक्त दिले होते. पहिल्यांदा काही झाले नाही. नंतर दुसऱ्यांदा दिले तेव्हा १० मिनिटांनी कसल्यातरी सह्या करण्यासाठी गेले. काऊंटरशी उभी राह्यले आणि नंतर एकदम आठवतेय ते तिथल्याच एका बाकावर आडवी झोपले होते आणि बरोबर आलेला काका घाबरला होता. अर्थातच चक्कर आली होती. हे का असे विचारल्यावर असं होतं कधी कधी एवढेच उत्तर मिळाले. नुकतेच हिमोग्लोबिन तपासले होते आणि ते उत्तम होते त्यामुळे तो प्रश्न नव्हताच. रक्त दिलेलेच होते त्यामुळे चक्कर आली म्हणल्यावर तपासले गेलेच आणि परत उत्तर तेच.. 'होतं असं कधी कधी.

तेव्हापासून भिती बसलीये विचित्र. चुकीचे आहे तरी खरे आहे. त्यातून आता हिमू पण तळ्यात मळ्यात असतं त्यामुळे येऊ देणार नाहीत मला. प्लेटलेटस् आणि हिमू चा किती संबंध असतो? रक्त देता येत नाही कमी असेल तर तसंच प्लेटलेटस् चं आहे का?

दिलेला दुवा वाचला. कान टोचणे आणि टॅटू याचा रक्तदानाशी संबंध कसा हे कळलं नाही. तसंच एकदा रक्त दिल्यावर चक्कर आली होती म्हणजे आता देऊ नये का? दुव्यावर तसा उल्लेख आढळला.